14 January 2020

माणूस काय करतो ?

माणूस काय करतो ?




कुढतो जास्त


अन् रडतो कमी


म्हणुन त्यांच ह्दय


धडधडत असतं नेहमी


 


बोलणं कमी झाल्यामुळे


प्रश्न निर्माण झालेत


सारं काही असूनही


एकलकोडे झालेत


 


भावनांचा कोंडमारा


होऊ देऊ नका


हसणं आणि रडणं


दाबून ठेऊ नका


 


आपल्या माणसांजवळ


व्यक्त झालं पाहिजे


खरं खरं दु:ख सांगून


मोकळं रडलं पाहिजे


 


हसण्याने,रडण्याने


दबाव होतो कमी


भावनांचा निचरा


ही FRESH होण्याची हमी


 


कुणाशी तरी बोला म्हणजे


हलकं हलकं वाटेल


दु:ख जरी असलं तरी


मस्त जगावं वाटेल


 


येऊद्यानं कंठ दाटून


काय फरक पडतो ?


आपल्या मानसाजवळच


गळयात पडून रडतो


 


आपली माणसं,आपली माणसं


बाजारात मिळत नसतात


नाती-गोती जपून ती


निर्माण करावी लागतांत


 


भौतिक साधनं जमवू नका


आपली माणसं जमवा


नाहीतर तुम्ही गरीब आहात


कितीही संपत्ती कमवा


 


हाय हॅलो चे मिञ बाबा


काही कामाचे नसतात


तुझी पाठ वळली की


कुचितपणे हसतात


 


हसण्यासाठी,रडण्यासाठी


माणसं जपून ठेव


नाहीतर मग घरात एखादा


रोबोट तरी आणून ठेव


 


रोबोटच्याच गळयात पडून


हसत जा,रडत जा


शांत झोप येण्यासाठी


दररोज गोळया घेत जा


 


दु:ख उरात दाबून वेडया


झोप येत नसते


हसत खेळत जगण्यासाठी


माणसांचीच गरज असते


 


इथून पुढे भिशी कर


हसण्याची अन् रडण्याची


हीच खरी औषध आहेत


डिप्रेशनच्या बाहेर पडण्याची 

माणूस काय करतो ?various type of poem

माणूस काय करतो ?various type of poem




11 January 2020

“पैशापेक्षा माणुस मोठा”


“पैशापेक्षा माणुस मोठा”


जन्माला आला तो


वंशाचा दिवा झाला

पहिल्याच दिवशी त्याला

जबाबदारीचा शिक्का लागला

 

थोडा मोठा झाला तो

भावंडांचा भाऊ झाला

आपल्या खेळण्यातला

अर्धा हिस्सा वाटू लागला

 

वयात आला तो

बहिणीचा रक्षक झाला

रक्षाबंधनाला तर

स्वत:ची मनिबॅक ही फोडू लागला

 

कॉलेजला गेला तो

मैञिणींचा मिञ झाला

तिच्या सुख दु:खाचा

आपसूक वाटेकरी बनला

 

लग्नामध्ये त्याच्या तो

दोन भूमिकेत आला

बायकोचा नवरा की आईचा मुलगा यात

अडकला

 

आईबापाच्या उतारवयात

त्यांच्या काठीचा आधार झाला

स्वत:साठी कमी अन्

घरासाठी जास्त जगू लागला

 

बाळाच्या चाहुलीने तो

बाप झाला

छकुलीच्या हास्यासाठी

राञंदिवस झटू लागला

 

छकुलीच्या लग्नामध्ये तो

वरबाप झाला

सगळयांच्या आनंदासाठी

आपले अश्रू लपवू लागला

 

नातवंडाच्या मेळयामध्ये तो

आजोबा झाला

दुधापेक्षा साईला

तळहाताच्या फोडासारखा जपू लागला

 

आत्ता कुठे त्याला

थोडा निवांतपणा मिळाला

जोडीदाराचा हात त्याने

खूप घट्ट पकडला

 

तो पर्यत त्याच्या

पिंज-यातील पिल्ले उडून गेली

बायकोची आाणि त्याची

हाडेही आत्ता थकून गेली

 

मनात असतानाही तो

मनाप्रमाणे जगला नाही

ठाम मते असतानाही

मत आपले मांडले नाही

 

आज देवाकडे तो

साथ फक्त मागतो आहे

बायकोच्या आधी ने मला

देवाला म्हणतो आहे

 

आयपर्यत आयुष्यभर तो

घरासाठी झटला आहे

स्मशानात जाताना माञ

रित्या ओंजळीने जातो आहे

 

ओंजळ रिकामी असली तरी

मन त्याचे भरले आहे

अत्यंविधीची गर्दी पाहून

माणुसकीचे फळ मिळाले आहे

 

जाता जाता सगळयांना

एकच तो सांगतो आहे

पैशापेक्षा माणसांना किंमत द्या

म्हणतो आहे 

 
“पैशापेक्षा माणुस मोठा”various type of poem
“पैशापेक्षा माणुस मोठा”various type of poem

10 January 2020

"पाऊस"various type of poem


"पाऊस"


या वेळेस पाऊस म्हणाला


मी परत नाही जाणार


दिवाळीची मजा मी


पण अनुभवणार


 


मी आल्यावर लोक करतात


नुसते उपास अन् तापास


कधीच मिळत नाही मला लाडू चिवडा


चकल्यांचा वास


 


वास घेऊन पदार्थाचा जेव्हा


होईल मी तृप्‌त


मगच ठरवलय मी


ह्या थंडीत होईल लुप्त


 


चातुर्मासातला फराळ म्हणजे


साबुदाणा अन् भगर


त्याला कशी येणार


दिवाळीच फराळाची सर


 


छञी रेनकोट बघुन बघुन


मी ही कंटाळलोय


दिवाळीचे नविन कपडे


बघायला मी थांबलोय


 


म्हटंल होत आपणही कुर्रम कुर्रम चकली


खाऊ


पण माझ्या अनपेक्षित थांबण्याने तीही झाली


मऊ


 


लाडू बसला फुगून


करंजी बसली गुरफटून


अतिथी देवो भव


सारेच कसे गेले विसरुन


 


मला बघून सारेच जण हिरमुसून बसले


उदास चेहरे बघून त्यांचे


मला रडू फुटले


 


बघायला होता मला


फटाक्यांचा धूर


पण रडण्याने माझ्या


आला रडण्याने माझ्या


आला नदीला परत पूर


 


शेवटी लोकांनी ठरवले कोणत्याही


परिस्थितीत आनंदी रहायचे


चकल्या नाही तर नाही


कांदाभज्यांवरच दिवाळी करायचे

"पाऊस"various type of poem
"पाऊस"various type of poem