15 December 2019

Manus Marathi Kavita



माणूस

पोळया झाल्या की भाकरी
अन भाकरी झाली की भाजी
स्वयंपांक करता करताच
बायको होइल आजी

गुडघे लागतील दुखायला 
तडकून जातील वाटया
दोघांच्याही हातात येतील
म्हातारपणाच्या काठया
जोरजोरात बोलाव लागेल

होशील ठार बहिरा
मसणात गव-या गेल्यावर
आणतो का तिला गजरा ?
तोंडात कवळी बसवल्यावर
कणीस खाता येईल का ?
चालतांना दम लागल्यावर
डोंगर चढता येईल का ?

अरे बाबा जागा हो
टाक दोन दिवस रजा
हसी मजाक करत करत
मस्तपैकी जगा

दाल-बाटी,भेळपुरी
आइस्क्रीम सुध्दा खा
आरोग्य उत्तम राहण्यासाठी
योगासन,प्राणायाम,ध्यान करुन
शहराबाहेर फिरायला जा


बिझी बिझी काय करता
वेळ काढा थोडा
आयुष्यभर चालूच असतो
संसाराचा गाडा………