10 January 2020

"पाऊस"various type of poem


"पाऊस"


या वेळेस पाऊस म्हणाला


मी परत नाही जाणार


दिवाळीची मजा मी


पण अनुभवणार


 


मी आल्यावर लोक करतात


नुसते उपास अन् तापास


कधीच मिळत नाही मला लाडू चिवडा


चकल्यांचा वास


 


वास घेऊन पदार्थाचा जेव्हा


होईल मी तृप्‌त


मगच ठरवलय मी


ह्या थंडीत होईल लुप्त


 


चातुर्मासातला फराळ म्हणजे


साबुदाणा अन् भगर


त्याला कशी येणार


दिवाळीच फराळाची सर


 


छञी रेनकोट बघुन बघुन


मी ही कंटाळलोय


दिवाळीचे नविन कपडे


बघायला मी थांबलोय


 


म्हटंल होत आपणही कुर्रम कुर्रम चकली


खाऊ


पण माझ्या अनपेक्षित थांबण्याने तीही झाली


मऊ


 


लाडू बसला फुगून


करंजी बसली गुरफटून


अतिथी देवो भव


सारेच कसे गेले विसरुन


 


मला बघून सारेच जण हिरमुसून बसले


उदास चेहरे बघून त्यांचे


मला रडू फुटले


 


बघायला होता मला


फटाक्यांचा धूर


पण रडण्याने माझ्या


आला रडण्याने माझ्या


आला नदीला परत पूर


 


शेवटी लोकांनी ठरवले कोणत्याही


परिस्थितीत आनंदी रहायचे


चकल्या नाही तर नाही


कांदाभज्यांवरच दिवाळी करायचे

"पाऊस"various type of poem
"पाऊस"various type of poem