30 December 2019

“ मी काय विसरलो ” WHAT DID I FORGET ?

 

“ मी काय विसरलो ”


घरात टी वी आला,


मी वाचन विसरलो !

 

दारात गाडी आली,


मी चालणे विसरलो !

 

हातात मोबाईल आला


मी पञलेखन विसरलो !

 

कॅलक्युलेटर वापरामुळे,


पाढेच म्हणणे विसरलो !


 

ए.सी च्या संगतीने ,


झाडाखालचा गारवा विसरलो !

 

शहरात राहिल्यामुळे,


मातीचा वासच विसरलो !

 

बिभत्स चिञामुळे,


सौदर्य पाहणे विसरलो !

 

कृञिम सेंटच्या वासाने,


फुलांचा सुगंध विसरलो !

 

फास्ट फुडच्या जमान्यात,


तृप्तीची ढेकर विसरलो !

 

स्वार्थी नाती जपल्यामुळे,


खरे प्रेम करणे विसरलो !

 

क्षणीक सुखाच्या लोभात,


सत्कर्मातला आनंद विसरलो !


 

सतत धावत असतांना,

क्ष्‍णभर थांबणे विसरलो !

 

Whatsapp आल्यापासुन,


सुखाने झोपणेही विसरलो !




   various type of poem "REMEMBER YOUR PAST"