28 December 2019

मुलीची तक्रार



एकदा एका मुलीनं

तक्रार केली बापाकडे

मलाच का बंधने ?

जाऊ नको कुणीकडे.....

 

का सारखे कपड्यांवरुन बोलणे

आणि माझ्या मिञां बाबत नेहमी चौकशी करणे ?

 

का मीच उंब-याच्या आत राहायचं,

आणि उठता बसता स्वत:ला सावरायचं.....

 

बाप बोलला,

बेटी म्हणणे तुझं पटतयं,

चल जरा बाहेर,

आत खूप उकडंतय....

 

बाजारपेठेतून जाताना दिसलं दुकान

लोखंडाचं,

बाहेर पडल होत अवजड सामान

लोहाचं.....

बाप बोलला,

 

बेटी,हे ऊनपावसात इथंच असतं

तरी पण याला काही होत नसतं,कोणी नेत नसतं

किमतीत पण याच्या अधिक उणं होत नसतं.......

 

जरा पुढे जाताच

ज्वलेरी शॉप दिसलं

आत जाऊन मग बापाने हि-याच मोल पुसलं,

तिजोरीतून बंद पेटी हळूवार पुढे मांडली,

त्याच्या झगमगाटात,नजरच दिपली......

 

सराफ बोलला किमती आहे,

फार जपावं लागतं,

जरा सुध्दा चरा पडता,

मोल याच कच-याच होत

काळजी घेऊन खूप,

मलमली कपड्यात जपून ठेवाव लागतं,

तिजोरीच्या आत लपवावं लागतं.......

 

फिरुन घरी येताच बाप बोलला बेटी !

तूच तर माझाी हि-याची पेटी,

सांग तुला जपण्यात काय माझं चुकतं

तुझ्यामुळेच माझं,घर सारं झगमगतं.....

 

तुझा दादा म्हणजे लोखंड,जपावं लागतं नाही,

तू म्हणजे अनमोल हिरा,

सांग चुकतं का काही.....

 

तुझ्यामुळेच घर प्रकाशित,

आमचा तु अभिमान,

तुझ्यासाठी काळीज तुटतं,

तु आमचा जीव की प्राण......

 

सर्व बघुन मुलीचे डोळे पाणवले,

बापापुढे झुकली मान शरमेने.....

कळल तिला सगळं,

मन तिचं हेलावल......

 

बस्स ! करा बाबा,

ऐकवत आता नाही,

तुमच्याकडे माझाी तक्रार मुळीच नाही......

मीच मला आता,

जीवापाड जपेन,

हि-याच्या तेजानं,

चौफेर चमकेन.....

 

मुलगा मुलगी समसमान,

हे जरी असलं खरं,

पण आपल्या बहीण-लेकीला अधिक

जपलेलच बरं.......

 

पटवून द्या तिला

बेटी !तू हिरा आहेस,

आमच्या आनंदाचा तू झरा आहेस.....

म्हणुन जपाव लागत........


ही कविता प्रत्येक मुली पर्यत पोचावी व तिन वाचावी ही अपेक्षा

"DOUGHTER"various type of marathi poem