08 January 2020

"माय मराठी" मराठी कविता ,marathi poem


"माय मराठी"



मम्मी म्हणा,मदर म्हणा,

“आई” शब्दात “मान” आहे.


पिता म्हणा,पप्पा म्हणा,

“बाबा” शब्दात “जाणीव” आहे.


सिस्टर म्हणा,दीदी म्हणा,

“ताई” शब्दात “मान” आहे.


ब्रो म्हणा,भाई म्हणा,

“दादा” शब्दात “वचक” आहे.


फ्रेंड म्हणा,दोस्त म्हणा,

“मिञा” शब्दात “शान” आहे.


एन्ड म्हणा,फिनिश म्हणा,

“अंत” शब्दात “खंत” आहे.


दिवार म्हणा,वॉल म्हणा,

“भिंत” शब्द “जिवंत” आहे.


रिलेशन म्हणा,रिश्ता म्हणा,

“नातं” शब्दात “गोडवा” आहे.


एनिमी म्हणा,दुश्मन म्हणा,

“वैर” शब्द जास्त “कडवा” आहे.


हाय म्हणा,हॅलो म्हणा,

हात जोडणे “संस्कार” आहे.



सर म्हणा,मॅडम म्हणा,

“गुरु” शब्दात अर्थ आहे.


 

ग्रॅड पा ग्रॅड मा शब्दात

काही मजा नाही

“आजोबा” आणि “आजी”

सारखे सुंदर नाते जगात नाही.



गोष्टी सर्व सारख्या

पण फरक फार अनमोल आहे


अ ते ज्ञ शब्दात “ज्ञानाचे” भांडार आहे.


म्हणुन इंग्रजी पेक्षा

आपल्या “मराठीत” आदर जास्‌त आहे. 

 
marathi poem,marathi kavita
"माय मराठी" MARATHI KAVITA

 

No comments:

Post a Comment