07 January 2020

“आई” MARATHI POEM

“आई”


आई म्हणजे काय असते


तिच्या आधी उठून बघ


तिच्या नंतर झोपून बघ


तिने दिली शिकवण तुला


त्या संस्काराने वागून बघ


अन एकदा तरी आयुष्यात


आई म्हणून जगून बघ


 

 


किती लावते माया तुला


कधी माया तिला लावून बघ


तुमच्यासाठी सारं मागते


कधी तिच्या साठी मागून बघ


अन एकदा तरी आयुष्यात


आई म्हणून जगून बघ


 

 


थंडी वा-या पावसां मधी


तिच्या सारखं राबून बघ


सकाळ दुपार राञी बेरीञी


तिच्या सारखं जागून बघ


अन एकदा तरी आयुष्यात


आई म्हणून जगून बघ


 

 


थकत नाही कधी तरी


निवांत तिला बसवून बघ


दोन शब्द बोल प्रेमाचे


मनमोकळं हसवून बघ


अन एकदा तरी आयुष्यात


आई म्हणून जगून बघ


 

 


तुच माझा स्ञोत प्रेरणेचा


कधी तिला सांगून बघ


कधी तरी तिच्या साठी


दीर्घायुष्‌य मागून बघ


अन एकदा तरी आयुष्यात


आई म्हणून जगून बघ 

mother is very great carefull

 “आई”various type of poem