"हिशोब"
काळाच्या अनावर
वाहत्या ओघात
आपल्या आयुष्यातल्या
काही वर्षाचा
हिशोब काय ठेवणार
?
आयुष्याने जर इतकं
अमर्याद दिलं आहे
तर मग जे मिळालं नाही
त्याचा हिशोब काय ठेवणार
?
सुहृदांनी दिला आहे
इतका स्नेह,इतकं प्रेम
तर शञूंच्या शञूत्वाचा
काय हिशोब ठेवणार
?
लख्ख्ं उजेडाचे
इतके दिवस आहेत इथे
तर राञींच्या अंधाराचे
काय हिशोब ठेवणार
?
आनंदाचे दोन क्षण
पुरेसे आहेत उमलण्याला
तर मग मनातल्या खिन्नतेचा
काय हिशोब ठेवणार
?
मधूर आठवणींच्या खूणा
इतक्या आहेत आयुष्यात
की थोड्याशा दु:खद
गोष्टींचा
काय हिशोब ठेवणार ?
इतकी फुले मिळाली आहेत
काही जिवलगांकडून
काटे किती बोचले
याचा काय हिशोब ठेवणार
?
चंद्राचे चांदणे इतके
ह्दयंगम आहे की
त्यावर कलंक केवढा
याचा काय हिशोब ठेवणार
?
केवळ आठवणीनींच
अंत:करण पुलकित होत
असेल
तर मग भेटलो न भेटलो
याचा हिशोब काय ठेवणार
?
काही ना काही नक्कीच
खूप छान आहे,प्रत्येकात
मग जरासे काही चुकले
असेल तर
त्याचा काय हिशोब ठेवणार
?
"हिशोब" various type of poem