26 December 2019

लाइटली घ्या


लाइटली घ्या

लाइटली घ्या थोंड समजून घ्या

खूप जास्त ताणू नका

सगळेच लाईटली  घ्या

प्रत्येकांनी एकमेकाला


थोंड फार मागे पुढे
होतच असंत
शंभर टक्के PERFECT
कुणीच नसंत


 माणुसकीही सर्वाकडे
असलीच पाहिजे
वागण्यातून नम्रता
दिसलीच पाहिजे


 छोटया छोटया गोष्टी वरुन
कशाला करायचं बंड
आपण गोड बोललंकी
समोरचा होतो थंड


 कधी कधी सारा विषय
फारच क्षुल्लक असतो
माणूस माञ विनाकारण
टेंशन मध्ये बसतो


 कसाही प्रसंग असला तरी
राहिल पाहिजे शांत
आपल्या सहनशीलतेचा
होऊ देऊने अंत


 घर असो ऑफिस असो
वा असो WHATS APP
भेटून घ्या,बोलून घ्या
पडू देऊ नका GAP


 भाषा असली स्वीट
की सगळ होतं नीट
कुणाचाच कुणाला
येत नाही वीट


 झालं गेल विसरुन जा
घ्या हातात हात
निमित्ताने भेटली आपण
दया हासून साथ