" पगार "
दोन महीने
झाले अजून
पगार नाही
झाला
बायको म्हणते
सुटीमध्ये
फिरायला चला
फिरणं तर
दुरच
ईथे खायचे
झाले वांदे
संध्याकाळच्या
भाजीमधले
गायब झाले
कांदे
लेकरांचा
हट्ट भारी
पप्पा पावभाजी
खाऊ
खोटंनाट सांगतो
त्यांना
ऊदया परवा
जाऊ
आई म्हणते
पोरा माझा
ड्रॉप आणुन
देना
मी म्हणतो
आई थोडं
Adjust करुन
घेना
बाबांच्याही
चश्म्याचा
नेमका तुटला
कांच
पगाराविना
जीवास या
भलताच झाला
जांच
किराण्याचे
बिल थकले
दुधाचेही
हाल
केबलवाला
म्हणतो कसा
केबल काट
डाल
पेपरवाला
पाणीवाला
करतो नुसते
फोन
बिल आमचे
पाठवा साहेब
महिने झाले
दोन
नोटीस आली
घरी
असं वाटलं
कॉन्ह्वेटपेक्षा
आश्रमशाळा
बरी
घराच्याही
हप्त्याची
जवळ आली तारीख
70 किलो वजनाचा
मी
चिंतेन झालेा
बारीक
लग्नसराईच्या
धामधुमीत
बॅलन्स गेलं
सरुनं
डोंगर चढला
कर्जाचा
जावं वाटे
मरुनं
कुटूंबाचा
आधार मी
निराधारासारखा
जगतो
चातकासारखी
पगाराची
फक्त वाट
बघतो