06 January 2020

“बाप”

“बाप”



बाप कुठे काय करतो ?


तो तर काय घराबाहेरच असतो.


सकाळी निघतो,धक्के खात कामावर जातो,


संध्याकाळी थकून घरी येतो.


 


घरी आल्या आल्या तक्रारी ऐकतो…इतकंच


यात काय विशेष ? बाप कुठे काय करतो ?


 


शाळेची फिस,घरचा महिन्याचा किराणा,


लाईटबिल,फोनबील…….


सगळं मॅनेज करतो,


महिना अखेरीस पाय ओढत घराकडे येतो.


 


घर चालवण्यासाठी वेळप्रसंगी उधारी करतो,


ती कशीतरी फेडतो………


पण,बाप कुठे काय करतो ?


 


मुलांच्या दुखण्याखुपण्यावर अस्वस्थ्‍ा होतो,


कुशीत घेऊन झोपत नसेल कदाचित,पण


राञभर तो ही जागा राहतो.


 


म्हाता-यांची आजारपणे,हॉस्पिटलचा खर्च


सगळयांची तरतूद करतो.


स्वत:ची दुखणी माञ अंगावरच काढतो.


पण त्याला कोण विचारतो ? कारण असंही


बाप कुठे काय करतो ?


 


कुटुंबासाठी लढतो,कधी जिंकतो कधी हारतो.


लढाईत झालेल्या जखमांना अलगद लपवतो


कुटुंबासमोर हसतो.


पुरुष आहे ना तो ? त्याला रडण्याची परवानगी


कुठे ?


 


सर्व प्रसंग आनंदाने साजरे करुन तो माञ


मनातच कुढतो.


तरी सुध्दा बाप कुठे काय करतो ? 


FATHER IS ALSO WORK OUR FAMILY

“बाप” various type of poem