31 December 2019

वर्ष सरता सरता “ बाय बाय 2019”


वर्ष सरता सरता  



वर्ष सरता सरता मी


त्या सर्वाचा ऋणी आहे


Whatsapp च्या प्रांतातील


प्रत्येकजण अगाध ज्ञानी आहे.

 

वर्ष भर आपण मला

आपल्या विद्यार्थ्यास वागवले

Goo night ने झोपवले

Good मॉर्निग ने जागवले

 

तांब्यापासून ते तुळशीपर्यत


उपयुक्तता मला शिकवली


पत्नीशी वागण्याची रीत सांगून


आमची नाती टिकवली

 

कुणाच्या हरवलेल्या कागदपञांची


मजवर सोपवली चिंता


सोप्या शब्दात समजावला


आर्थिक नियोजनाचा गुंता

 

नसलेल्या सरकारी योजनांचे


Messeges सुध्दा पाठवले


मोबाईल हॅग होईपर्यत


ते storage मध्ये साठवले

 

अंधश्रध्दाचे messages सुध्दा


शपथ देऊन करवले शेअर


खरच माझ्या संपन्नतेची


तुम्हाला किती केअर

 

पण गुरुदक्षिणा म्हणून


मी तुम्हाला अंगठा देणार नाही


कारण तसे केल्याने मला


मोबाईल वापरता येणार नाही.

 

various type of poem