04 January 2020

“कुणाच्या इतक्याही”


“कुणाच्या इतक्याही”


कुणाच्या इतक्याही जवळ जाऊ नये की


आपल्याला त्याची सवय व्हावी,अन


तडकलेच जर हृदय कधी


तर जोडताना असह्य यातना व्हावी !


 

 


स्वप्नात कुणाला असंही बघू नये


की आधाराला त्याचे हात असावे


अन् तुटलेच जर स्वप्‌न अचानक तर


हातात आपल्या काहीच नसावे !


 

 


कुणाला हतकाही वेळ देऊ नये


की आपल्या क्षणा क्षणावर


त्याचाच अधिकार व्हावा


अन एक दिवस आरशासमोर आपणास


आपलाच चेहरा परका व्हावा !


 

 


कुणाची इतकीही ओढ नसावी


कि पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी


अन त्याची वाट बघता बघता


आपलीच वाट दिशाहीन व्हावी ।


 

 


कुणाची इतकीही सोबत नसावी


की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी


अन ती साथ गमावण्याच्या भीतीने


डोळयांत खळकन् आसवे जमावी ।


 

 


कुणाला इतकेही माझे म्हणू नये


की आपले मी पण


आपण विसरुन जावे


अन त्या संभ्रामात त्याने आपल्याला


ठेच देऊन जागे करावे !


 


पण , पण ……….


 


कुणापासून इतकेही दूर जाऊ नये


की आपले जगणेच मुश्लिक व्हावे,


अन ……………


दूर दूर आवाज दिला तरी


आपलेच शब्द जागीच घुमावे……

 

 “कुणाच्या इतक्याही”VARIOUS TYPE OF POEM